जागतिक दिवसः महत्त्वाच्या घटनाः २००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला. १९९९ : गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर १९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा 'पोलार संगीत पुरस्कार' विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर १९६३ : चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला. १९४८ : महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. १९४४ : दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला. १९३७ : फ्रेंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली. १८४१ : ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला. १७८८ : इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती. |
दिनविशेष